गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (13:36 IST)

लग्नानंतर अभिनेत्री हृता दुर्गुळेचा पहिला फोटो समोर आला

सध्या सिनेविश्वात लग्नसराईचा हंगामा सुरु आहे. मन उडू उडू झालं, दुर्वा होऊन, फुलपाखरू सारख्या मराठी मालिकांमध्ये अभिनय करून घरा- घरातून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान करण्याऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने  देखील 18  मे रोजीअभिनेत्री मुग्धा शाहचा मुलगा दिग्दर्शक प्रतीक शहाशी गुपचूप लग्न केले. त्यानंतर नवं दाम्पत्य फिरायला बाहेर गेले असता अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नानंतरचा फोटो टाकला आहे. हृता दुर्गुळे हिने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर तिचा आणि प्रतीक शहा चा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची कबूली दिली होती. त्यांनी 24 डिसेंबर 2021रोजी साखरपुडा केला.  

त्यानंतर त्यांनी 18  मे रोजी लग्न करून आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता हे दोघे लग्नानंतर टर्कीला फिरायला गेले असताना अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो टाकला आहे.