मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (16:00 IST)

तुझ्यात जीव रंगलाच्या वहिनी साहेबांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

The return of Jeev Rangala's Vahini Saheb on the small screen Marathi Cinema News
फोटो साभार-ट्विटर 
तुझ्यात जीव रंगला ही मालिका घरा घरात प्रख्यात झाली.या मध्ये नंदिता वाहिनीसाहेबांची नकारात्मक भूमिका साकारणारी धनश्री काडगांवकर हिने आपल्या खलनायिकेच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांचे मन जिंकले होते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा,अंजली,गोदाक्का यांच्या सह वहिनीसाहेबानी देखील प्रेक्षकांच्या मनात अभिनयाचा ठसा उमटवला.आता या मधील वाहिनीसाहेब म्हणजे धनश्री काडगांवकर  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'घेतलेला वसा टाकू नको' या मालिकेच्या रूपात नवरात्री विशेष भागात एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मध्ये ती दुर्गा मातेच्या भूमिकेत दिसणार आहे.मला ही भूमिका मिळल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते असे धनश्रीने म्हटले.