बुधवार, 24 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 डिसेंबर 2025 (11:52 IST)

नाट्यदिग्दर्शक,अभिनेते रणजित पाटील यांचं वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Theatre director and actor Ranjit Patil passed away at the age of 42 due to a heart attack. Ranjit Patil's death
नाट्यदिग्दर्शक,अभिनेते रणजित पाटील यांचं वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांना गेल्या काही महिन्यांपासून हृदयाशी संबंधित तक्रारी जाणवत होत्या त्यांच्यावर उपचार सुरु होते. 
त्यांना राहत्याघरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनी जग सोडले. वयाच्या 42 व्या वर्षी त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
रणजित पाटील जर तर ची गोष्ट या नाटकाचे दिग्दर्शन करत होते. या नाटकात प्रिया बापट आणि उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे. या नाटकाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
 रणजीत पाटील यांचे शिक्षण मुंबईतील प्रसिद्ध रुईया महाविद्यालयात झाले होते. रुईयामधील एकांकिकांच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती.
रणजित पाटील यांनी मराठी मालिकाविश्वात व रंगभूमीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. यासह त्यांनी अनेक तरुण रंगकर्मींना प्रोत्साहन देत त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं होतं. 
त्यांनी झी मराठीची मालिका हृदयी प्रीत जागते या मालिकेत अभिनय केला. 
त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. 
 
Edited By - Priya Dixit