शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (19:39 IST)

'त्या' सिनेमातील 'ती' आक्षेपार्ह दृश्ये वगळण्यात आली

marathi cinema
मराठी, हिंदी सिनेमा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘नाय वरण भात लोन्चा कोण कोन्चा’या सिनेमातील काही आक्षेपार्य दृष्यांमुळे सिनेमा चांगलाच चर्चेत आलाय. सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणात सिनेमावर आणि महेश मांजरेकर यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र आता सिनेमातील ती आक्षेपार्ह दृश्य वगळण्यात आली असून सिनेमाचा जुना ट्रेलर युट्यूब तसेच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन काढून दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी शरणागती पत्करली आहे.   
 
सेन्सॉरने ‘ए’सर्टिफिकेट दिल्यानंतरही जी दृश्ये संवेदनशील वाटतात आणि भविष्यात ज्याचा त्रास होऊ शकतो असे वाटते ती दृश्ये सिनेमातून आम्ही वगळत आहोत असे त्यांनी म्हटले. सिनेमाचा नवा ट्रेलर आम्ही लवकरच रिलीज करू अशी माहिती सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे सिनेमाच्या माध्यातून कोणाच्याही भावना दुखवल्या असतील तर त्याबद्दल मनापासून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली आहे.