suvichar
✕

उपेंद्र आणि वीणाची जोडी जमली

Updated: शुक्रवार, 7 जुलै 2023 (14:16 IST)
 
‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय चित्रपटातून रंजकपणे मांडण्यात आला आहे. या चित्रपटातील नायकाच्या, अभिमन्यूच्या भूमिकेत उपेंद्र लिमये तर त्याच्या पत्नीच्या म्हणजेच विमलच्या भूमिकेत वीणा जामकर आहे.
 
या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमच्या मैत्रीमुळे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावरही चांगलीच खुलली असल्याचं या दोघांनी सांगितले.  केवळ मनोरंजन एवढा एकच निकष सध्या मराठी चित्रपटांना लागू नाही. अनेक सामाजिक विषयही आज उत्तम प्रकारे हाताळले जात आहेत. ‘आणीबाणी’ चित्रपटाचा वेगळा विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला.
 
कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. छायांकन मंगेश गाडेकर, संकलन प्रमोद कहार, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

नाना पाटेकरांचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला

एकता कपूरने 'द डर्टी पिक्चर २' ची घोषणा केली; १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा एक बोल्ड कथा पडद्यावर दिसणार

जेष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

माँ दुर्गेची अमर गाथा मोठ्या पडद्यावर, 150 हून अधिक कलाकार बनवत आहे हॅन्ड ड्रॉन ऍनिमेशन चित्रपट 'महादेवी आदिशक्ती'

चतुरशृंगी टेकडीवर वसलेले जागृत श्री चतुरशृंगी देवी मंदिर पुणे

पुढील लेख
Show comments