शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2023 (07:58 IST)

मराठ्यांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा ‘रामशेज’

ramsej movie
३५० व्या शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत ‘आलमंड्स क्रिएशन्स प्रोडक्शन’ने ‘रामशेज’ या भव्यदिव्य ऐतिहासिक मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’च्या यशानंतर आणि ‘मुरारबाजी’ चित्रपटाचे चित्रीकरण जोमात सुरु असतानाच निर्माते अजय आरेकर आणि अनिरूद्ध आरेकर आपल्या ‘आलमंड्स क्रिएशन्स’द्वारा ‘रामशेज’ ही चौथी कलाकृती शिवप्रेमींसाठी घेऊन येत आहेत.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रातील किल्ले जिंकून आपली सल्तनत बुलंद करण्याचा मनसुबा बोलून दाखवला आणि त्याची पहिली नजर पडली ‘रामशेज’ किल्ल्यावर पण हा किल्ला सर करायला त्याला एक नाही.. दोन नाही.. तब्बल साडे सहा वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही किल्ला जिंकता आला नाही. केवळ ६०० मावळ्यांनी हा किल्ला प्राणपणाने जपला; तो हस्तगत करण्यासाठी शहाबुद्दीन खान, फतेह खान आणि कासम खान यांसारख्या मातब्बर सरदारांनी अक्षरशः शर्थ केली पण हाती केवळ निराशा आली. त्या ६०० मावळ्यांच्या शौर्याची, चिकाटीची आणि बुद्धिचातुर्याची चित्तथरारक गोष्ट म्हणजे ‘रामशेज’.
Edited by : Ratnadeep Ranshoor