सोमवार, 4 डिसेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जून 2023 (13:23 IST)

आकाश ठोसर साकारणार ‘बाल शिवाजी', पोस्टर प्रदर्शित

Baal Shivaji Poster Out “लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो.” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘बाल शिवाजी’ असे या चित्रपटाचाचे नाव असून यामध्ये सैराट फेम सर्वांचा लाडका परश्या म्हणजेच आकाश ठोसर छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. या दिनानिमित्त चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
 
आकाश ठोसरने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे ज्यात तो तरुण छत्रपती शिवरायांच्या लूकमध्ये दिसत आहे.
 
‘बाल शिवाजी’ च्या रुपात परश्याच्या हातात तलवार, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात कवड्यांची माळ अन् भेदक नजर हा लूक बघायला मिळत आहे.
 
"लहान असो वा मोठा वाघ 'वाघच' असतो”
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळादिनानिमित्त सादर आहे,
स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर. असं कॅप्शन आकाशने या पोस्टरला दिले आहे.
 
या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.