ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन
ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. दया डोंगरे यांचा जन्म 1940 साली झाला. अभिनयाची गोडी त्यांना लहानपणापासूनच लागली. त्यांचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज मध्ये झाले. या वेळी त्यांनी एकांकिका स्पर्धेतून अभिनयाची सुरुवात केली. नंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून अभिनयाचे शिक्षण घेतले.
त्यांच्या मातोश्री यमुताई मोडक या नाट्य अभिनेत्री होत्या, तसेच आत्या शांता मोडक या गायिका तर पणजोबा कीर्तनकार होते. त्यामुळे अभिनयाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. त्यांचे लग्न शरद डोंगरे यांच्याशी झाले आणि त्यांनी लग्नानन्तर देखील अभिनय सुरूच ठेवले.
दूरदर्शनची गजरा मालिकेतून त्या प्रसिद्ध झाल्या. खट्याळ सासू नाठाळ सून, नवरी मिळे नवऱ्याला, लालची, नकाब, कुलदीपक मराठी आणि हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान बनवले.
तसेच त्यांनी तुझी माझी जमली जोडी रे, नांदा सौख्यभरे, आव्हान, स्वामी, लेकुरे उदंड झाली या मालिकेत आणि नाटकांत काम केले. चित्रपटांमध्ये त्या खाष्ट सासूच्या भूमिका करून आपली छाप सोडली. त्यांनी 1990 च्या काळात चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली. त्यांच्या दमदार भूमिकेमुळे त्यांनी आज देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
Edited By - Priya Dixit