शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (12:16 IST)

बिगबॉस मराठी 3 मध्ये विशालसाठी विकासने टक्कल केलं

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 3 च्या आगामी भागात प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन पाहायला मिळणार आहे. बिगबॉस मधील सर्व स्पर्धक उत्कृष्ट खेळी खेळत आहे .बिगबॉस मधील स्पर्धकांनी हे सिद्ध केले की काहीही झाले तरी 'मैत्रीचं पारडं नेहमीच वजनी असतं.' 
कॅप्टन्सी टास्क 'पारडं कॅप्टनसी चा' आगामी नवीन एपिसोडमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. टास्कनुसार, स्पर्धकांना त्यांच्या आवडत्या गोष्टींना गमवावे लागणार आहे. मीराला तीच सॉफ्ट टॉय, परिवाराचे फोटो तर दादूसला त्याचे केस द्यावे लागणार आहे. 
 
शोच्या निर्मात्यांनी एक मनोरंजक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये विकासने विशाल घरचा कॅप्टन बनावा यासाठी आपले केस कापण्यास सुरु केले. तर विशालने देखील मित्रासाठी स्वतःचे केस कापून टक्कल केली आहे. हे बघून सर्वाना धक्काच बसला आहे. मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे यांच्यासह इतर सर्व स्पर्धक, उमेदवारांपैकी एकाला घराचा कर्णधार बनवण्यासाठी त्यांच्या आवश्यक आणि आवडत्या गोष्टींचा त्याग करतील. ते काय असणार हे पुढील भागात बघायला मिळणार.