शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (14:43 IST)

आम्ही कोणताही चुकीचा इतिहास चित्रपटात दाखवलेला नाही : दिग्दर्शक

har har mahadev
‘हर हर महादेव’चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. पत्रकारांशी संवाद साधताना अभिजीत देशपांडे म्हणाले, “आम्ही कोणताही चुकीचा इतिहास चित्रपटात दाखवलेला नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्ड कडून प्रमाणपत्र मिळालं आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे, त्यासंदर्भातील दस्ताऐवज आम्ही ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’कडे पुरविले आहेत. ‘सीबीएफसी’च्या पॅनेलवर अनेक तज्ज्ञ, इतिहासकारही असतात. हे सगळं तपासूनच चित्रपटाला मान्यता दिली गेली आहे. कोणत्याही चित्रपटाला अशीच मान्यता मिळत नाही. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर टीका करणे चुकीचे आहे”.
 
‘हर हर महादेव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवर चुकीचा इतिहास दाखवला असल्याचा आक्षेप घेतला जात आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना अभिजीत देशपांडे म्हणाले “आमच्या टीमकडून याबाबत लवकरच सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे. आक्षेप घेतलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, ऐतिहासिक संदर्भ याबाबत लवकरच सविस्तर भूमिका मांडली जाईल”.
Edited by : Ratnadeep Ranshoor