संबंधित माहिती
- IND vs SL: कोरोनाने भारत-श्रीलंका मालिकेला ब्रेक लावला, 13 जुलैपासून सामने होणार नाहीत; नवीन वेळापत्रक जाणून घ्या
- आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
- “बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखं वागतील असं वाटलं नव्हतं”
- आनंदाची बातमी : राज्यात मान्सूनचे संकेत
- Monsoon Tips: पावसाळ्यात पायांची काळजी घ्या, निष्काळजीपणामुळे संसर्ग होऊ शकतो
'वेलडन बॉईज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
लहान मुलांच्या जीवनावर आधारित असलेला 'वेलडन बॉईज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साईनाथ चित्र यांची निर्मिती असलेला हा चित्रपट असून लहान मुलांच्या भावविश्र्वावर या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे.
'वेलडन बॉईज' या चित्रपटाचे लेखन अशोक बाफना व किशोर ठाकूर यांचे असून अशोक मानकर व महेंद्र पाटील यांनी संवाद लिहिले आहेत. या सिनेमांच चित्रीकरण व तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्याची माहिती दिग्दर्शक प्रकाश आत्माराम जाधव यांनी दिली आहे.
प्रत्येक शाळेत जसे हुशार विद्यार्थी असतात तसेच खोडकर, उनाड व मस्तीखोर विद्यार्थीही असतात. परंतु या मुलांमध्येही कुठेतरी चांगले गुण दडलेले असतात. या मस्तीखोर मुलांचे अंधकारमय भविष्य शिक्षकांमार्फत कसे प्रकाश करता येईल, असा एक प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. चित्रपटातील आशिष निनगुरकर व अशोक मानकर लिखित गाण्यांना श्रीरंग आरस व एस.पी.सेन यांनी संगीत दिले आहे. पल्लवी केळकर, श्यामल सावके, गीता व जे.पी दत्ता यांनी ही गाणी गाली आहेत.
या चित्रपटात मोहनजोशी, विजय पाटकर, शिल्पा प्रभुलकर, प्रिय रंजन, विनोद जॉली, महेंद्र पाटील व आशिष निनगुरकर यांच्याबरोबर अनेक बालक लाकारदेखील अभिनय करताना दिसणार आहेत. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
