शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (21:08 IST)

प्रत्येक वर्ष पुढे सरकत असताना मी तुझ्या आणखी प्रेमात पडतेय---दीपा चौधरी

deepa choudhary
Instagram
अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याला अनेक चाहते शुभेच्छा देताना दिसत आहे. नुकतंच अंकुशची बायको आणि अभिनेत्री दीपा चौधरी हिनेही तिच्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
 
अंकुश चौधरीची पत्नी दीपा चौधरी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच दीपा चौधरीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने अंकुशबरोबरचे काही फोटोही शेअर केले आहेत. त्या फोटोला दिलेल्या कॅप्शनने तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
 
“वाढदिवसाच्या आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक वर्ष पुढे सरकत असताना मी तुझ्या आणखी प्रेमात पडतेय. तू माझ्या आयुष्यात घडलेली सर्वोत्तम गोष्ट आहेस. जीवनाच्या प्रत्येक पैलूत आपल्या बायकोला साथ देणारा धीरगंभीर पती असल्याबद्दल तुझे धन्यवाद! माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे” असे दीपाने अंकुशला लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor