सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (20:51 IST)

फायरिंग करून सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करणे युवकाला पडले महागात

gunshot
नाशिक : दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी रहिवाशी परिसरात पिस्तोलमधून फायरिंग करत ‘तो’ व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करणार्‍या इसमाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, ऑक्टोबर २०२२ मध्ये दिवाळीच्या दिवशी आकाश संजय आदक (वय २४,रा. ध्रुवनगर, सातपूर-गंगापूर लिंकरोड, नाशिक) याने त्याच्या ताब्यातील पिस्तोलमधून भर वस्तीत फायर केले होते. नंतर हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला होता.
 
सदर व्हिडिओ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाल यांच्या हाती लागताच त्यांनी आकाशचा शोध घेणे तेव्हापासून सुरू ठेवले होते. नंतर त्याचा शोध सुरूच होता त्याल आता  त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता दिवाळीमध्ये आपणच फायरिंग केल्याची कबुली त्याने दिली.
 
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दिड लाख रुपये किंमतीची पिस्तोल ताब्यात घेत त्याच्याविरूद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Edited by : Ratnadeep Ranshoor