रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (20:47 IST)

महाराष्ट्राची हास्यजत्रा दिग्गज कलाकार राष्ट्रवादीत, अजित दादांनी पद दिलं

prabhakar more ajit panwar
खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. सध्या सोशल मीडियावरही महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहून नेटीझन्सचं मनोरंजन होत आहे. त्यामुळे, या हास्यजत्रेतील कलाकारांचाही मोठा चाहता वर्ग तयार झाला असून ते चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आहेत. याच महाराष्ट्राचची हास्यजत्राफेम अभिनेते प्रभाकर मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याहस्ते त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. यावेळी, त्यांच्यावर कोकण विभागाची जबाबदारीही देण्यात आली आहे.    
 
प्रभाकर मोरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न यावेळी कोकण विभागीय सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदाची प्रभाकर मोरे यांची नेमणूक करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, प्रभाकर मोरे यांच्या कलेमधून नेहमी कोकणातील संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. गेल्या वीस पंचवीस वर्षाचा त्यांचा अनुभव आहे त्यांनी गावागावातून खेड्यातून शहरांमध्ये येऊन आपली कला सादर केलेली आहे. त्यामुळेच आपण त्यांना टीव्हीवर बघत असतो. आज त्यांना त्यांचे कलागुण इतरांना शिकवण्याची आवड आहे आणि त्यासाठीच त्यांची कोकण विभागात राष्ट्रवादीकडून अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.