मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 15 एप्रिल 2015 (11:05 IST)

होय अनुष्काचा सहवास आवडतो : विराट कोहली

virat kohali
... हो मला अनुष्काचा सहवास आवडतो. ती माझी उर्मी आहे. इतकेच नव्हे तर कुणी कितीही टीका केली तरी विश्वकप स्पधेर्नंतर आमच्यातील नाते अधिक घट्ट झाले, अशी सपशेल कबुली विराट कोहलीने एका कार्यक्रमात बोलताना दिली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असलेला विराट म्हणाला, माझ्या व्यक्तीगत जीवनात कुणीही हस्तक्षेप केलेले मला आवडत नाही. अनुष्काबाबतीत झालेल्या टीकेबद्दल सांगयचे झाले तर आॅस्ट्रेलिया दौºयावर ती सोबत असताना मी चांगली कामगिरी केली होती. ती मैदानावर असताना शतकही ठोकले होते, हे क्रिकेट चाहत्यांनी सोयीस्करपणे विसरु नये. भारताच्या पराभवासाठी अनुष्काला जबाबदार धरण्यात येईल, याचा मी कधी विचारही केला नव्हता, अशी खंतही त्याने व्यक्त केली.