मंगळवार, 26 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (21:28 IST)

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर मुंबई सोडणार आहे,का सोडणार ?

arjune tendulkar
अर्जुन तेंडुलकर मुंबई सोडणार आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. मात्र हे खरं आहे. अर्जुन आगामी देशांतर्गत हंगामात मुंबईकडून नाही तर शेजारील गोव्याकडून खेळण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी अर्जुनने मुंबई क्रिकेट संघटनेकडे एनओसी मागितली आहे.  
 
अर्जुनला मुंबईकडून 2020-2021 या सिझनमध्ये केवळ 2 मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. अर्जुन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये  हरियाणा आणि पाँडेचरीविरुद्ध अशा दोनच मॅच खेळला होता.
 
ज्युनिअर तेंडुलकर का सोडणार मुंबईची टीम?
अर्जुनला करियरच्या या टप्प्यावर अधिकाधिक मॅचेस खेळयला मिळणे महत्त्वाचंय. अर्जुनने टीम बदलली तर त्याला अधिक मॅचेस खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, असा म्हटलं जात आहे. अर्जुन करियरच्या एका नव्या टप्प्याला सुरुवात करत असल्याचं सचिन तेंडुलकर क्रीडा व्यवस्थापनाने एका निवेदनाद्वारे म्हटलंय.
 
अर्जुन श्रीलंकेविरुद्ध अंडर-19 टीम इंडियाकडून 2 टेस्ट मॅच खेळला आहे. अर्जुनला या मोसमात मुंबईतून वगळलं जाणं हे निराशाजनक होतं. दरम्यान अर्जुनला कामगिरीत सातत्य राखण्याची गरच असल्याचं मत क्रिकेट विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे.