शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (15:05 IST)

अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार ? चर्चांवर स्वतः दिलं उत्तर

ashok chouhan
राज्यातील राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींमध्ये आणखी एक चर्चा चांगलीच रंगलेली दिसत आहे ती म्हणजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची बातमी. मात्र स्वत: चव्हाणांनी यावर उत्तर देत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मी असा कुठलाही निर्णय घेतला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
 
अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे विधानसभेतील तब्बल 11 आमदार बहुमत चाचणीदिवशी सभागृहात गैरहजर होते. यानंतर या आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेस हायकमांडनेही आमदारांवर कडक कारवाई करणार असल्याचं समजत असल्यामुळे अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या होत्या.