शनिवार, 26 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (08:27 IST)

आयसीसशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्रातही एनआयएने कारवाई केली

NIA
महाराष्ट्रात आयसीसी संबंध असल्याच्या संशयावरून ‘एनआयए’ने रविवारी पहाटे रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील अल्ताफ आणि इर्शाद शेख या सख्ख्या भावांची चौकशी करून सोडून दिले. दरम्यान, दुपारी शेख बंधूंच्या कार्यालयाची जमावाने तोडफोड केल्यानंतर तेथे तणावाचे वातावरण आहे. नांदेडमध्येही ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधाच्या संशयावरून शहराच्या इतवारा भागातून तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची दिवसभर चौकशी करण्यात आली. १४ तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. मात्र  व्हॉट्सअप संभाषण झालेला मोबाइल आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली
 
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही एनआयएने कारवाई केली. आयसिसच्या दहशतवादी कारवायांप्रकरणी मध्य प्रदेशच्या भोपाळ आणि रायसेन जिल्ह्यातही काही संशयितांचा शोध घेण्यात आला.  एनआयएने केरळमध्येही सथिक बाचा ऊर्फ आयलीएएमए सथिक याच्या अटकेच्या अनुषंगाने शोधमोहीम राबवली. सथिक बाचा याने अन्य चार साथीदारांसह गेल्या फेब्रुवारीमध्ये वाहन तपासणीवेळी पोलिसांना मारण्याचा प्रयत्न केला होता. तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील या शोधमोहिमेत काही डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.