गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (15:38 IST)

Raireshwar Fort : रायरेश्वर किल्यावर ट्रेकिंगला आलेल्या विद्यार्थ्यांचा हृदयविकाराने दुर्देवी मृत्यू

बारामतीच्या भोर येथून रायरेश्वर किल्यावर ट्रेकिंग साठी शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय मध्ये 46 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांसोबत आलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थाला ट्रेकिंगला जात असता हृदयविकाराचा जोरदार झटका आल्यामुळे त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम चोपडे असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. शुभम हा करमाळा तालुक्यातील उंब्रट गावाचा असून शिक्षणासाठी बारामती येथे राहत होता. अवघ्या कोवळ्या वयात शुभमच्या मृत्यूने त्याच्या मित्रांना आणि शिक्षकांना धक्का बसला असून  त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. 
   
शुभम हा 46 विद्यार्थ्यांसह आणि 4 शिक्षकांसह रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जात असताना सकाळी नऊवाजेच्या सुमारास भोर रायरेश्वर मार्गावरील कोर्ले येथे एका हॉटेलवर चहा नाश्त्यासाठी थांबले. नंतर सगळे गाडीत बसताना शुभम ला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याला हृदयविकाराचा जोरदार झटका आला त्याला तातडीनं जवळच्या आंबवडे येथे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.