सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (07:45 IST)

अथिया-केएल राहुल “या” तारखेला अडकणार लग्नबंधनात

मुंबई : सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल हे दोघा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अथिया आणि केएल राहुलच्या हळद, मेहेंदी आणि संगीत सोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अद्याप दोघांनी देखील लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेले नाही.
 
अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला मात्र सुरुवात झाली आहे. अथिया आणि केएल राहुल २३ जानेवारी २०२३ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीट्या खंडाळा येथील बंगल्यात अथिया आणि केएल राहुलचा लग्नसोहळा पार पडणार आहे. सलमान खान, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली असे अनेक सेलिब्रिटी अथिया आणि केएल राहुलच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
 
अथिया आणि केएल राहुलचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अथिया आणि केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अथिया आणि केएल राहुलच्या लग्नसोहळ्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor