1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified रविवार, 3 जुलै 2022 (16:28 IST)

AUS vs SL: नॅथन लियॉनने तोडला कपिल देवचा विक्रम

गॅले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. पहिल्या कसोटीत नऊ विकेट घेणारा ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लायन कसोटीत सर्वाधिक 436 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 
 
नॅथनने भारताचा कपिल देव (434), श्रीलंकेचा रंगना हेराथ (433) आणि न्यूझीलंडचा रिचर्ड हॅडली यांना मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात लियॉन आणि ट्रॅव्हिस हेडने प्रत्येकी चार बळी घेतले. 
 
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 212 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात 8 बाद 313 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडोने पॅट कमिन्सला (26) यॉर्करचा बळी बनवले. त्यानंतर त्याने मिचेल स्वीपसनला (01) इन-स्विंगरसह बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव 321 धावांवर संपुष्टात आणला. नॅथनने सर्वोत्तम कामगिरी केली. 
 
उभय संघांमधला दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ८ जुलैपासून गाले येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात ७७ धावा करणाऱ्या कॅमेरून ग्रीनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.