बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: लंडन , गुरूवार, 4 जून 2020 (12:54 IST)

बेन स्टोक्सकडे इंग्लंडचे नेतृत्व?

इंग्लंडचा कर्णधार जो रूट जुलैमध्ये वेस्ट इंडीजविरूध्द सुरूवातीच्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण त्याची पत्नी दुसर्या मुलाला जन्म देणार असून बाळंतपणाचा कालावधीही याचदरम्यान येत असल्याने या दरम्यान उपकर्णधार बेन स्टोक्सकडे इंग्लंडचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे.
 
वेस्ट इंडीजचा संघ वेळापत्रकात बदल केल्यानंतर जुलैमध्ये इंग्लंडच्या दौर्याइवर येणार आहे. ही कसोटी मालिका प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियमवर खेळली जाणार आहे. आठ जुलैला पहिली कसोटी सुरू होणार असून त्याच दरम्यान रूटच्या मुलाचा जन्म होणार आहे. दरम्यान रूटने सांगितले की, मला वाटते की, बेन कर्णधार झाला तर योग्यच होईल.
 
त्याची चांगली गोष्ट ही आहे की तो उदाहरण समोर दाखवतो. ज्या पध्दतीने तो सराव करतो, अवघड परिस्थितीत कशा पध्दतीने गोलंदाजी केली पाहिजे व वेगवेळ्या परिस्थितीत कशी फलंदाजी केली पाहिजे हे तो स्वतःच दाखवतो. त्यामुळे तो उत्तम कर्णधार होऊ शकतो.