शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 13 मे 2020 (07:12 IST)

वंदे भारत अभियानांतर्गत इंग्लंडमध्ये अडकलेल्या ३३१ भारतीय सुखरुप आपल्या देशात परतले

वंदे भारत अभियानांतर्गत एअर इंडियाच्या विमानांनी इंग्लंडमध्ये अडकलेल्या ३३१ भारतीयांची सुटका केली आहे. या प्रवाशांना घेऊन एक विमान सकाळी हैदराबाद इथं उतरलं.
 
त्यानंतर हेच विमान इंग्लंडच्या ८७ प्रवाशांना घेऊन दिल्लीमार्गे इंग्लंडला रवाना झालं. फिलिपाईन्सची राजधानी मनिला इथं अडकलेल्या १३९ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान गुजरातमध्ये अहमदाबाद इथं दाखल झालं.
 
हे सर्व विद्यार्थी आपापल्या गावांकडे रवाना झाले असून, तिथे त्यांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जाणार आहे.