15 ओव्हर आणि 38 धावांत आयर्लंडचा सुपडा साफ

England
सव्वा दोन दिवस, चार इनिंग्ज आणि 40 विकेट्स या कल्लोळात इंग्लंडने सख्खे शेजारी आयर्लंडला एकमेव कसोटीत 143 धावांनी चीतपट केलं. चौथ्या डावात 182 धावांचं लक्ष्य मिळालेल्या आयर्लंडचा डाव अवघ्या 38 धावांतच आटोपला.
पहिल्या डावात अवघ्या 85 धावांत आटोपलेल्या इंग्लंडने आयर्लंडविरुध्दच्या एकमेव कसोटीत खळबळजनक विजयाची नोंद केली. आयर्लंडला विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य मिळालं होतं मात्र इंग्लंडच्या भेदक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर आयर्लंडचा डाव 15.4 ओव्हर्समध्ये 38 धावांवरच गडगडला आणि इंग्लंडने 143 धावांनी विजय मिळवला.

ख्रिस वोक्सने 17 धावांत 6 विकेट्स घेत आयर्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. स्टुअर्ट ब्रॉडने 19 धावांत 4 विकेट्स घेत वोक्सला चांगली साथ दिली. दहा दिवसांपूर्वी इंग्लंडने लॉर्डस इथेच न्यूझीलंडला नमवत पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर नाव कोरलं होतं.
आयर्लंडविरुध्दच्या एकमेव कसोटीत इंग्लंडची दाणादाण उडाली आणि त्यांचा पहिला डाव 85 धावांतच आटोपला. टिम मुर्तगाने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. आयर्लंडलने 207 धावांची मजल मारत मोठी आघाडी मिळवली. अलेक्स बलर्बिनीने सर्वाधिक 55 धावा केल्या.

इंग्लंडने दुसऱ्या डावात चिवटपणे खेळ करत 303 धावांची मजल मारली. नाईट वॉचमन जॅक लिचने 92 तर जेसन रॉयने 72 धावांची खेळी केली. इंग्लंडने आयर्लंडसमोर 182 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र गवत असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत आयर्लंडचा धुव्वा उडवला. एक तारखेपासून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेला सुरुवात होत आहे.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

Women’s T20 World Cup : भारत उपांत्य फेरीत

Women’s T20 World Cup : भारत उपांत्य फेरीत
महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी ...

सचिन केवळ क्रिकेट खेळण्यासाठीच जन्माला आला, इंझमामने केलं ...

सचिन केवळ क्रिकेट खेळण्यासाठीच जन्माला आला, इंझमामने केलं भरभरुन कौतुक
पाकिस्तान क्रिकेट संघाचे दीर्घकाळ यशस्वी नेतृत्व करणार्‍या इंझमाम उल हक याने एक व्हिडीओ ...

बीसीसीआयने शेअर केला जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाचा ...

बीसीसीआयने शेअर केला जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाचा एरियल व्ह्यू
जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान गुजरातमध्ये बांधण्यात आले आहे. येत्या 24 तारखेला ...

रोहित शर्माला या मैदानावर बॅटिंग करायची इच्छा

रोहित शर्माला या मैदानावर बॅटिंग करायची इच्छा
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचे लक्ष्य आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे ...

सचिन, सेहवाग, युवराज, जहीर पुन्हा एकत्र क्रिकेट खेळणार

सचिन, सेहवाग, युवराज, जहीर पुन्हा एकत्र क्रिकेट खेळणार
सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, वीरेंद्र सेहवाग, ब्रेट ली यासारखे दिग्गज ...