बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (08:24 IST)

तरुण अडकला टॉयलेट मध्ये अनेक तासांनी पोलिसांनी केली सुटका

मुंबई येथे वसई विरार महानगरपालिकेने हद्दीमध्ये रस्त्यावर सर्वत्र रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांसाठी सुविधे साठी मोबाईल टॉयलेट बसवले आहेत. याच टॉयलेट उपयोग करायला गेलेल्या एक 23 वर्षीय तरुण अडकला होता. पण काही तासानंतर नालासोपारा पोलिसांनी त्याची सुटका केली आहे.
 
नालासोपारा पश्चिमेकडील साईबाबा मंदिराच्या समोरील रस्त्यावर वसई विरार महानगरपालिकेने मोबाईल टॉयलेट नागरिकांच्या सुविधेसाठी लावले आहेत. याच टॉयलेटमध्ये दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास धीरज कुमार पाल हा 23 वर्षीय तरुण अडकला होता. मात्र त्याला मदत काही तेथून मागता येईना म्हणून त्याने सुटकेसाठी नालासोपारा पोलीस ठाण्यात 2 ते 3 वेळा फोन केला, मात्र नेमक्या कोणत्या ठिकाणी असलेल्या टॉयलेट मध्ये अडकला हे त्याला सांगता येत नव्हते. पत्ता व्यवस्थित न सांगता आल्याने चार पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. पण असे टॉयलेट साईबाबा मंदिराच्या समोर असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी जाऊन पोलीस कॉन्स्टेबल वैभव काकडे यांनी त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.