मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 9 जानेवारी 2019 (08:37 IST)

टीम इंडियाला बोनस जाहीर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय मिळवत ७१ वर्षांमध्ये भारताला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकता आली. याचबरोबर ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर बीसीसीआयनं भारतीय खेळाडूंना बोनस जाहीर केला आहे. प्रत्येक मॅचच्या फी एवढा बोनस या खेळाडूंना मिळणार आहे. त्यामुळे मॅच खेळणाऱ्या ११ खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये एका मॅचचे, बाकावर बसलेल्या खेळाडूंना ७.५ लाख रुपये प्रत्येकी एका मॅचचे मिळणार आहेत. म्हणजेच चारही टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंना ६० लाख रुपयांचा बोनस मिळेल.
 
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं याबद्दलचं प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली आहे.  खेळाडूंसोबतच प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफनाही बोनसची घोषणा करण्यात आली आहे. प्रशिक्षकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे, तर सपोर्ट स्टाफलाही बोनस देण्यात येणार आहे.