1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
  4. 78-day payroll bonus to the railway employees

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा पगाराचा बोनस

78-day payroll
रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर झाला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा फायदा जवळपास १२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. आता रेल्वे मंत्रालयाकडून याबाबतची अमलबजावणी केली जाणार आहे.
 
यातील ठराविक रक्कम दसऱ्याच्या अगोदर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. उर्वरित रक्कम दिवाळीच्या बँक खात्यात जमा होईल. रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांना हा बोनस मिळणार नाही.
पुढील लेख
गुगलकडून लवकरच गुगल+ बंद