1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जुलै 2025 (10:19 IST)

टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले

Shubman Gill
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले आहे. या शतकी खेळीसह त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहे.
 
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सलग दोन शतके झळकावली आहे. लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावले, त्यानंतर आता त्याने एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे. गिलचे इंग्लंडविरुद्धचे हे सलग तिसरे कसोटी शतक आहे. या शतकी खेळीसह, त्याने इंग्लंडविरुद्ध सलग तीन शतके झळकावण्याच्या बाबतीत राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी बरोबरी केली आहे.
 
शुभमन गिल इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये सलग तीन शतके झळकावणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे.  
Edited By- Dhanashri Naik