बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated :मुंबई , गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (15:40 IST)

बुमराहसाठी गांगुलींकडून नियमात बदल

केरळविरुद्धच्या रणजी सामन्यात जसप्रीत बुमराह गुजरात संघाकडून खेळणार होता. पण अखेरच्या क्षणी तो संघातून बाहेर पडला. दुखापतीतून बाहेर आलेल्या बुमराहसाठी सौरभ गांगुली यांनी बीसीसीआयच एका नियमात बदल करत हा निर्णय घेतला आहे. 
 
सूरतमधील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर गुजरात विरुद्ध केरळ यच्यातील रणजी स्पर्धेतील सामना सुरू झाला आहे. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार होता त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण अखेरच क्षणी बुमराह या सामन्यातून बाहेर झाला. चार महिन्यांपूर्वी दुखापत झालेल्या बुमराहची श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मलिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. लंकेविरुद्ध पाच जानेवारी रोजी होणार्‍या पहिल्या टी-20 सामन्याआधी बुमराहला रणजी सामना खेळण्यास सांगणत आले होते. पण बुमराहला स्वतःला अधिक गोलंदाजी करायची नव्हती.
यासंदर्भात त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना सांगितले होते. त्यानंतर गांगुली यांनी बुमराहसाठी नियमात बदल करत विश्रांती करण्याची परवानगी दिली.
 
केरळविरुद्धच रणजी सामन्यात जसप्रीतला खेळायचे होते. पण चार महिन्यानंतर मैदानात पुनरागमन करताना त्याला शरीरावर अधिक भार टाकाचा नव्हता. यामुळेच त्याने गांगुलींसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी बीसीसीआयचे सचिव जय शहा यच्याशी बोलून जसप्रीतला केवळ पांढर्‍या चेंडूवर खेळण्याचा सल्ला
दिला. बुमराहसाठी गांगुली यांनी नियमात बदल केल्यामुळे आता तो थेट श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या टी-20 मालिकेत खेळेल.
 
बीसीसीआयच्या नियमानुसार कोणताही गोलंदाज दुखापतीनंतर जेव्हा पुन्हा मैदानात पुनरागमन करतो तेव्हा त्याला फिटनेस सिद्ध करावी लागते. फिटनेस सिद्ध केल्यानंतरच तो भारतीय संघाचा भाग होऊ शकतो. पण गांगुली यांनी बुमराहसाठी हा नियम बाजूला ठेवत थेट आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची परवानगी दिली.
 
गुजरात संघाला नको होता बुमराह 
सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाच्या व्यवस्थापनाकडून बुमराहला एका दिवसात 12 पेक्षा
अधिक षटके टाकण्यास देऊ नये, अशी सूचना गुजरात संघाला देण्यात आली होती. गुजरात संघाला असा खेळाडू संघात नको होता जो फक्त 12 षटके टाकेल. यात अखेर गांगुली यांनी बुमराहला विश्रांती करण्याचा सल्ला दिल्याने तो आता गुजरातकडून खेळणार नाही.