रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: ढाका , गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (15:05 IST)

पाकमध्ये कसोटी खेळण्यास बांगलादेशचा नकार

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानात कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला आहे. बांगलादेशचा संघ पाकिस्तानात फक्त टी-20 मालिका खेळेल असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष निझामुद्दीन चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 
 
आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. पाकिस्तानात आम्ही फक्त टी-20 मालिका खेळू. मात्र, आमच्या बोर्डाशी संलग्न असलेले काही घटक कसोटी मालिका पाकिस्तानात खेळणसाठी उत्सुक नाहीत. त्यामुळे कसोटी मालिकाही त्रयस्थ ठिकाणी खेळली जाईल, असेही ते म्हणाले.