बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

IPL 2019: लिलावानंतर चेन्नई सुपर किंग्जची 'धोनी आर्मी' तयार

आयपीएल 2019 ची लिलाव संपला आहे. सर्व संघाने आपल्या रणनीतीवर काम करताना खेळाडूंना आपल्या सोबत जोडले. मागील विजेता चेन्नई सुपर किंग्जकडे केवळ दोन खेळाडूंसाठी जागा रिकामी होती. अशा प्रकारे महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील या टीमने भारतीय गोलंदाज मोहित शर्मा आणि युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडला टीममध्ये घेतले. आता त्यांची एकूण खेळाडूंची संख्या 25 पर्यंत गेली आहे. तसे, मोहित शर्मा यापूर्वी देखील महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळला आहे. 
 
* मोहित आणि ऋतुराज यांना असे घेतले :-
 
बोली सुरू झाल्याच्या बऱ्याच वेळानंतर पर्यंत चेन्नई सुपर किंग्ज कडून हालचाल झाली नाही पण मोहित शर्माचे नाव आल्यानंतर लगेच त्यांनी बोली लावली. अनेक संघाला पराभूत करून सीएसकेने मोहित शर्माला 5 कोटी रुपये मध्ये घेतले. यानंतर 
 
शेवटच्या चरणात ऋतुराज गायकवाडला 20 लाख रूपयांची मूळ किमतीसह घेतले. सीएसकेने आपल्या बऱ्याच खेळाडूंना राखून ठेवले होते म्हणून केवळ 2 स्लॉट उरले होते. आपल्या स्लॉटमध्ये दोन्ही खेळाडूंना घेतल्यानंतर देखील चेन्नईकडे पैसे 
 
शिल्लक राहिले. मोहित शर्माच्या आगमनाने चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी मजबूत होईल आणि टीमला फायदा अपेक्षित आहे. ऋतुराज गायकवाडला एक तरुण खेळाडू आहे.
 
* चेन्नई सुपर किंग्जची टीम या प्रकारे आहे :-
 
1. टीमचे राखीव खेळाडू - एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, दीपक चहर, के. एम. असिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, फफ डु प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिशेल सांतार, डेव्हिड विली, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी इंगंगी, इम्रान 
 
ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजनसिंग, दीपक चहर, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोनू कुमार आणि चैतन्य विष्णोई.
 
2. लिलावमध्ये खरेदी केलेले खेळाडू - मोहित शर्मा (5 कोटी), ऋतुराज गायकवाड (20 लाख)