गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

धोनी 20 संघात नाही, चाहते नाराज

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे.मात्र यात मोठा बदल झाला  असून  महेंद्रसिंग धोनीला या दोन्ही मालिकेतून वगळण्यात  आले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारताची धुरा रोहित शर्माकडे  आहे.  नियमित कर्णधार विराट कोहलीला ही विश्रांती  दिली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेचे नेतृत्त्व मात्र विराट कोहलीकडेच असणार असून, दोन्ही मालिकेत यष्टीरक्षणाची जबाबदारी युव रिषभ पंतकडे सोपवली आहे.  राष्ट्रीय निवडकर्त्यांनी एखाद्या मालिकेसाठी पहिल्यांदाच धोनीला संघाबाहेर केल्यामुळे क्रिकेटचाहत्यां मध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
 
विंडीजविरुद्ध टी२० मालिकेचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव आणि शाहनाझ नदीम.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा टी२० संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि खलील अहमद.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार.