मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (10:42 IST)

विराटला १० हजार धावांचा विक्रमही खुणावतोय

virat kohali
भारत आणि विंडीजमधील दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणमध्ये रंगणार आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा विक्रमही खुणावतोय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी विराट कोहलीला आणखी ८१ धावांची आवश्यकता आहे. यासह कोहली मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जलद १० हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही मोडित काढणार आहे. सचिननं २५९ डावात १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर विराटला २०५ डावांमध्ये दहा हजारी मनसबदार होण्याचा मान मिळण्याची शक्यता आहे.