गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (16:01 IST)

मागणी मान्य, पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला सोबत नेता येणार

भारताचा कर्णधार विराट कोहली याने नुकतेच बीसीसीआयकडे परदेशी दौऱ्यावर खेळाडूंच्या पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला सोबत नेण्याबाबत असलेल्या नियमात बदल व्हावेत अशी मागणी केली होती. ही मागणी बीसीसीआयच्या कार्यकारी समितीने मान्य केली आहे. पण, यात एक अट घातली आहे. 
 
बीसीसीआयच्या न्यायालय नियुक्त कार्यकारी समितीने परदेशी दौऱ्यावर पत्नी किंवा गर्लफ्रेंडला घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. पण, दौऱ्याचे पहीले दहा दिवस झाल्यानंतरच पत्नी किंवा गर्लफ्रेंडला बोलवण्यात यावे अशी अट घातली आहे. दहा दिवसांनंतर दौरा संपेपर्यत त्या थांबू शकतील.