गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018 (10:44 IST)

ओबामा यांचा पत्नी मिशेलसाठी एक सुरेख असा संदेश

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा  यांनी नुकतीच केलेली एक पोस्ट नेटकऱ्यांना चक्क 'कपल गोल्स' देले आहे. आपल्या लग्नाच्या २६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी पत्नी मिशेलसाठी एक सुरेख असा संदेश लिहिला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ दिल्याबद्दल त्यांनी पत्नीचे आभारही मानले आहेत.
 
'मिशेल... लग्नाच्या २६ व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एक अद्वितीय साथीदार म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. तू एक अशी व्यक्ती आहेस जी माझ्या चेहऱ्यावर नेहमीच हसू खुलवते. हे सारं जग पाहण्यासाठीही ज्या व्यक्तीची साथ मला लाभलीये ती तू आहेस....', असं त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे. 
 
मिशेल यांचा खिडकीतून बाहेर बघतानाचा सुरेख असा फोटो पोस्ट करत त्यांनी या कॅप्शनच्या वाटे आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे. ओबामा यांच्या शुभेच्छांचे मिशेल यांनीही आतापर्यंत प्रत्येक वेळी साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच आयुष्याच्या प्रत्येक वळणवर त्यांची साथ देण्याची हमीही दिली आहे.