रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (16:27 IST)

चाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल

विराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते ट्रोल झाले आहेत. मुंबई विमानतळावरुन बाहेर पडताना विरुष्का भोवती अनेक चाहत्यांनी घोळका केला होता. विरुष्काच्या एका चाहत्याने त्यांच्यासाठी एक खास फोटोंचा कोलाज तयार करुन आणला होता. हे कोलाज विरुष्कापर्यंत पोहोचावं यासाठी हा चाहता प्रयत्न करत होता. मात्र विरुष्काने या चाहत्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं.
 
दरम्यान, विरुष्काने या चाहत्याला केवळ धन्यवाद केलं आणि त्याचं गिफ्ट न घेताच पुढे रवाना झाले. या संबंधित प्रकाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. काही नेटकऱ्यांनी विराटला उद्धट म्हटलं आहे. तर काहींनी विरुष्काला वागण्याची पद्धत नसल्याचं म्हटलं आहे.