मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

स्वातंत्र्य दिनावर कोहलीने देशवासीयांना दिले चॅलेंज

भारतीय किक्रेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांनी स्वातंत्र्य दिन खास प्रकारे साजरे करण्यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सर्व देशवासीयांसकट आपले साथी खेळाडू शिखर धवन आणि ऋषभ पंत यांना एक चॅलेंज दिले आहे.
 
विराटच्या या चॅलेंज अंतर्गत आपल्याला स्वातंत्र्य दिन लुक सोशल मीडियावर शेअर करायचे आहे. विराटने यासाठी धवन आणि रिषभ पंत या दोघांना नॉमिनेट केले आहे.
 
कोहलीने व्हिडिओ शेअर करत म्हटले की तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा, लहानपणी ही ओळ ऐकलेली आठवण अजून ही जपलेली आहे म्हणून या वेशभूषेत स्वातंत्र्य दिनावर नवीन लुकमध्ये दिसण्यासाठी शिखर, ऋषभ आणि सर्व देशवासीयांना नॉमिनेट करतो. स्वातंत्र्यावर अभिनंदन.
 
सोशल मीडियावर शेअर करा आणि #Veshbhusha जोडणे विसरू नका विसरू नका.