गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (09:54 IST)

अश्‍विन, जडेजा, शमी यांना विश्रांती?

कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजांवर पडलेला ताण ध्यानात घेऊन, तसेच आगामी मोसमातील व्यस्त वेळापत्रकाच्या दृष्टीने श्रीलंकेविरुद्ध 20 ऑगस्ट रोजी सुरू होत असलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघातील रविचंद्रन अश्‍विन व रवींद्र जडेजा या फिरकीवीरांना विश्रांती देण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त आहे. तसेच दुखापतीतून परतलेला वेगवान गोलंदाज महंमद शमीलाही विश्रांती देण्यात येऊ शकते. त्यांच्या जागी यजुवेंद्र चाहल, अक्षर पटेल व कृणाल पांड्या या खेळाडूंचा समावेश करण्यात येऊ शकतो. झटपट क्रिकेटमधील स्पेशालिस्ट म्हणून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश निश्‍चित मानला जात आहे. वन डे मालिकेसाठी येत्या 13 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार असून कर्णधार विराट कोहली मात्र या मालिकेत खेळण्याबाबत आग्रही आहे.