बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (18:25 IST)

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची मुलगी सना कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली अद्याप कोरोनामधून बाहेर आले नव्हते की त्यांची मुलगी सना गांगुलीही या साथीच्यारोगाच्या विळख्यात अडकली. सना गांगुली देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र, सनाने स्वत:ला आयसोलेट केले आहे. गांगुली यांची पत्नी डोनाचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. गांगुलीला कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. अधिका-यांनी सांगितले होते की गांगुली गंभीर नसल्यामुळे त्यांना आठ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्वारंटाईनमध्ये राहून त्यातून बरा होऊ शकतो.
RT-PCR चाचणीत कोविड 19 पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून 49 वर्षीय गांगुली यांना सोमवारी रात्री वुडलँड्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल थेरपी देण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला गांगुलीला दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ह्रदयाच्या काही समस्यांमुळे त्यांची आपत्कालीन अँजिओप्लास्टी करण्यात आली.