शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (18:17 IST)

IND vs SA: शार्दुल ठाकूरच्या धमाकेदार गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेला झटका, 3 विकेट्स घेतले

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवशी लंच पूर्वी शार्दुल ठाकूरने आपल्या किफायतशीर गोलंदाजीने भारतीय संघाचे दमदार पुनरागमन केले. शार्दुल ठाकूरने उपाहारापूर्वी यजमान संघाच्या 3 फलंदाजांना आपली शिकार बनवले. तेव्हापासून सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शार्दुल ठाकूरने कर्णधार डीन एल्गरला आपला पहिला बळी बनवला. एल्गर न भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणत होते . शार्दुलने त्याला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. एल्गरने 120 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या.
यानंतर शार्दुलने रसी व्हॅन डर डुसेनला आपला बळी बनवत टीम इंडियात पुनरागमन केले. डुसेन अवघी एक धाव काढून बाद झाला. यानंतर शार्दुल ठाकूरने फलंदाज कीगन पीटरसनला मयंक अग्रवालकडे झेलबाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. पीटरसनने 118 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या.  शार्दुलच्या दणकेबाज गोलंदाजी मुळे दक्षिण आफ्रिकेचे तीन खेळाडू  पॅव्हेलियनला परतले.