मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 16 सप्टेंबर 2025 (16:59 IST)

युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना ईडीने समन्स बजावले

Yuvraj Singh
ईडीने माजी अष्टपैलू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना समन्स बजावले आहे. हे समन्स ऑनलाइन बेटिंगशी संबंधित एका प्रकरणात पाठवण्यात आले आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने युवराज सिंग यांना समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने युवराज सिंग यांना ऑनलाइन बेटिंगशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात २३ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन माजी भारतीय क्रिकेट खेळाडू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना समन्स बजावले आहे. २२ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
 
यापूर्वी याच प्रकरणात ईडीने टीम इंडियाचे माजी सलामीवीर शिखर धवन आणि सुरेश रैना यांनाही चौकशीसाठी बोलावले.  तसेच ईडीने म्हटले आहे की उथप्पा, युवराज सिंग आणि अभिनेता सोनू सूद यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.  
 
Edited By- Dhanashri Naik