इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या २५ व्या वर्षी निवृत्त घेतली
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो इंग्लंडसाठी फक्त चार आंतरराष्ट्रीय सामने खेळला.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तो २०१४ मध्ये इंग्लंडसाठी चार आंतरराष्ट्रीय सामने खेळला होता, पण आता त्याने अचानक व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे तो गेल्या वर्षी जूनपासून एकही सामना खेळला नव्हता. या सततच्या दुखापतीमुळे त्याला क्रिकेट सोडण्याचा कठीण घ्यावा लागला.
ALSO READ: श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला; शुभमन गिलला दुखापत
जॉन टर्नरचा जन्म जोहान्सबर्ग येथे झाला. हॅम्पशायरसोबतच्या त्याच्या कराराची आणखी दोन वर्षे शिल्लक होती. टर्नरने एका निवेदनात म्हटले, "व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे हे नेहमीच माझे स्वप्न राहिले आहे. हॅम्पशायर आणि इंग्लंडसाठी खेळणे हे बालपणीचे स्वप्न जगण्यासारखे होते." तो म्हणाला, "मी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, आणि तुम्ही समजू शकता की, हा माझ्यासाठी आतापर्यंतच्या सर्वात कठीण निर्णयांपैकी एक होता. माझ्या पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे मी एका वर्षापेक्षा जास्त काळ खेळापासून दूर होतो." माझ्या दुखापतींच्या इतिहासाने मला क्रिकेटमधील आणि क्रिकेटबाहेरील माझ्या भविष्याचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले.Edited By- Dhanashri Naik

