बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: केपटाउन , सोमवार, 7 डिसेंबर 2020 (12:16 IST)

इंग्लंड-द.आफ्रिका लढत; कोरोनामुळे दुसर्यांदा रद्द

England
यजमान दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये चार डिसेंबर रोजी पहिला एकदिवसीय सामना होणार होता. मात्र, सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्मयामुळे सामना रद्द करण्यात आला होता. 4 तारखेला रद्द करण्यात आलेला सामना, रविवारी केपटाउनमध्ये होणार होता. मात्र, पुन्हा एकदा सामन्याआधीच कोरोनाची बामती समोर आली. त्यामुळे सामना पुन्हा रद्द करण्यात आला आहे. 
 
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघातील खेळाडू थांबलेल्या हॉटेलमधील दोन कर्मचार्यांहना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्ड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा सामना थोडा उशिराने सुरु करण्याबाबत एकमत झाले. मात्र, थोड्यावेळानंतर सामना रद्द करण्यात निर्णय घेण्यात आला. आयसीसीने टि्वट करत याबाबतची माहिती दिली.