भारतात होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा रद्द

नवी दिल्ली| Last Modified गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (15:08 IST)
भारतात 2021 मध्ये होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोरोना संसर्गाच्या साथीमुळे रद्द करण्यात आली आहे. आता 2022 मध्ये होणार्याध या स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाच्या स्थितीचा जगभरातील आढावा घेण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) हा निर्णय घेतला आहे. वास्तविक कुमारी विश्वचषक स्पर्धा यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात होणार होती. मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा 2021 मध्ये फेब्रुवारी-मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र सध्याची कोरोनाची स्थिती पाहता आणखी काही काळ विश्वचषक लांबवणे योग्य होणार नसल्याचे ‘फिफा'ने स्पष्ट केले. भारताला 2022 मधील कुमारी विश्वचषक फुटबॉलचे यजमानपद देण्यात आले आहे. कोस्टा रिकाला 2022 मध्येच होणार्याम 20 वर्षांखालील महिला विश्वचषकाचा मान देण्यात आला आहे, असे ‘फिफा'ने स्पष्ट केले.

भारताने याआधी 2017 मध्ये कुमारांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन पाहून कुमारींच्या विश्वचषकाचे जानपद भारताला देण्याचा निर्णय ‘फिफा'ने घेतला होता.

यजमानपद भारताकडे असल्याने भारताच्या कुमारी संघाचा या स्पर्धेत सहभाग निश्चित होता. देशातील पाच ठिकाणे त्यासाठी निवडण्यात आली होती. नवी मुंबई, भुवनेश्वर, कोलकाता, गुवाहाटी, अहमदाबाद येथे ही स्पर्धा 2021 मध्ये खेळण्यात येणार होती.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

अंधश्रद्धा चूक की बरोबर

अंधश्रद्धा चूक की बरोबर
आजचा काळ विज्ञानाच्या असून देखील बरेच लोक अंधश्रद्धे मध्ये विश्वास ठेवतात. अशे लोक भोंदू ...

कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक ...

कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला दरम्यान, ...

मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार

मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अर्थात शनिवारी अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करणार ...

राज्यात कोरोनाचे 5,229 नवीन रुग्ण वाढले

राज्यात कोरोनाचे 5,229 नवीन रुग्ण वाढले
महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे 5,229 नवीन रुग्ण वाढले असून 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू ...

वाचा, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती अशोक चव्हाण यांनी ...

वाचा, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती अशोक चव्हाण यांनी काय दिली
येत्या ९ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाच सदस्यीय ...