शुक्रवार, 2 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मार्च 2017 (13:19 IST)

धोनी असलेल्या हॉटेलमध्ये आग

fire-at-hotel-dhoni-escapes
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी असलेल्या हॉटेलमध्ये आग लागली आहे. दिलासादायक बाब म्हणजे महेंद्रसिंह धोनीसह सर्व खेळाडू सुरक्षित आहेत.दिल्लीच्या पालममध्ये विजय हजारे ट्रॉफीचा सामना होणार होता. त्यासाठी महेंद्रसिंह धोनी दिल्लीत आला होता. परंतु आगीत खेळांडूंचं क्रिकेट किट जळाल्याने आजचा सामना रद्द करण्यात आला आहे.हॉटेलमध्ये गुरुवारी संध्याकाळी आग लागली. त्यानंतर सर्व खेळाडूंना हॉटेलमधून सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आगीत फार मोठं नुकसान झालं खेळाडूंचे किट जळाले. त्यामुळे आजचा सामना उद्या खेळवण्यात येणार आहे.