रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 14 डिसेंबर 2022 (22:12 IST)

माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफचा भीषण अपघात

ब्रिटिश क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफचा भीषण कार अपघात झाला आहे. तो लोकप्रिय बीबीसी टेलिव्हिजन शो "टॉप गियर" साठी शूटिंग करत असताना त्याला कार अपघात झाला. यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात नेण्यात आले. ब्रिटिश मीडिया रिपोर्ट्सनुसार, 45 वर्षीय फ्लिंटॉफ यांना रुग्णालयात नेण्यापूर्वी घटनास्थळी उपचार करण्यात आले. फ्लिंटॉफला दुखापत झाली असून ते  धोक्या बाहेर आहे .मंगळवारी दक्षिण लंडनमधील डनफोल्ड पार्क एरोड्रोम येथे इव्हेंटच्या चाचणी ट्रॅकवर फ्लिंटॉफला अपघात झाला.
 
फ्लिंटॉफ हे इंग्लंडच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. त्यांना ‘फ्रेडी’ म्हणून ओळखले जाते. फ्लिंटॉफने वयाच्या 32 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांनी इंग्लंडकडून 79 कसोटी सामने खेळले. त्याच्याकडे बॅट आणि बॉल अशा दोन्ही बाजूंनी सामने फिरवण्याची क्षमता होती. त्याने स्वबळावर इंग्लंडला अनेक सामन्यांमध्ये चॅम्पियन बनवले. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत, फ्लिंटॉफने 2005 आणि 2009 मध्ये इंग्लंडला ऍशेस जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता
 
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, फ्लिंटॉफने हिट मोटरशो टॉप गियर सह-प्रस्तुत करण्यास सुरुवात केली. ते  येथेही खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या अपघातानंतर, बीबीसीच्या प्रवक्त्याने सांगितले: "आज (मंगळवारी) सकाळी टॉप गियर चाचणी ट्रॅकवर झालेल्या अपघातात फ्रेडी जखमी झाला, जिथे क्रू डॉक्टर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
 
Edited by - Priya Dixit