बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (11:05 IST)

माजी भारतीय क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात मृतदेह आढळला

salil ankola
Photo- Instagram
सलील अंकोला यांच्या आईचा मृतदेह घरात सापडल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सलील अंकोला यांनीही आईच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. जिथे त्यांनी ओम शांती असे लिहिले आहे.प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी या कठीण दिवसाचा सामना करावा लागतो. धैर्य राखा. महादेवजी दिवंगत आत्म्यास शांती देवो.
 
सलील अंकोला यांच्या आईचे नाव माला अशोक अंकोला आहे. माला अशोक अंकोला (७७) या पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे प्रभात रोड परिसरात राहत होत्या. त्यांच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ बंद राहिल्याने त्यांच्या घरात काम करणाऱ्या लोकांनी दरवाजा उघडला असता वृद्ध माला बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली, तिचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला होता. त्यानंतर त्यांचे कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले

. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. सध्या हे प्रकरण हत्येचे आहे की आत्महत्येचे, पोलीस अधिक तपास करत आहेत.
त्याने आपल्या कारकिर्दीत खेळल्या गेलेल्या एका कसोटी सामन्यात फक्त दोन विकेट घेतल्या आणि 20 एकदिवसीय सामन्यात फक्त 13 विकेट घेतल्या
Edited By - Priya Dixit