रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (12:07 IST)

गांगुलीने केलं मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचं कौतुक

ऑस्ट्रेलियाविरोधातील बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात मिळवलेल्या विजयाबद्दल बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतीय संघाचं अभिनंदन केलं असून कर्णधार अजिंक्य अजिंक्य रहाणेचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 
 
सौरव गांगुलीने ट्विट करत अजिंक्य रहाणेचं विशेष उल्लेख केला आहे. त्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मिळवलेल्या विजयाचे कौतुक केले आहे. अजिंक्य रहाणेच्या शतकामुळे भारताच्या विजयाचा मार्ग सोपा झाल्याचे कौतुक होत आहे.
 
सौरव गांगुलीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मेलबर्न क्रिकेट मैदानावर विशेष विजय…भारताला या मैदानावर खेळायला आवडतं…वेल डन अजिंक्य रहाणे…चांगली लोकं नेहमी पहिल्या क्रमांकावर येतात..सर्वांचं अभिनंदन..जडेजा आणि अश्विन यांना पुढील दोन सामन्यांसाठी बीसीसीआयकडून ऑल द बेस्ट”.
 
 
मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय संघाने मिळवलेला हा चौथा विजय आहे.