बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (13:20 IST)

20 हजार चेंडू टाकणारा अश्विन पाचवा गोलंदाज

ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या कसोटी मालिकेत रविचंद्रन अश्विनने दमदार कामगिरी केली आहे. त्याने दुसर्या कसोटीत पहिल्या डावात तीन गडी बाद केले आहेत. तर दुसर्याग डावात आतापर्यंत केवळ एकच गडी बाद केला आहे. मात्र, यासोबतच त्याने एका विशेष यादीत आपले स्थान पक्के केले आहे.
 
बॉक्सिंग डे कसोटी त्याने आतापर्यंत 23 षटके गोलंदाजी केली आहे. याचदरम्यान तो कसोटी सामन्यात 20 हजार चेंडू टाकणार्याक गोलंदाजांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
 
अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय  गोलंदाज ठरला आहे. भारताकडून कसोटीमध्ये सर्वात जास्त चेंडू टाकण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावे आहे. त्याने 40 हजार 580 चेंडू टाकले आहेत. तर दुसर्याि क्रमांकावर हरभजन सिंह (28 हजार 580), तिसर्याच स्थानावर कपिल देव (27 हजार 740) यांचे नाव आहे. त्यांनी एकूण 21 हजार 364 चेंडू टाकले आहेत. एकूणच बोलायचे झाले तर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. तने 133 कसोटीसामन्यांमध्ये 44 हजार 39 चेंडू टाकले आहेत.