महाराष्ट्राची परंपरा जोपासणारा उत्सव 'भोंडला'

Bhondla festival
Last Modified मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (10:00 IST)
नवरात्र म्हटले की सर्वत्र एक चैतन्यमयी आणि उत्साहवर्धक पावित्र्य असे वातावरण होत आणि नवरात्र म्हटलं की आठवण येते ती भोंडल्याची ज्याला भुलाबाई किंवा हादगा असे ही म्हणतात. हा उत्सव खास स्त्रियांसाठी साजरा होतो. वेग-वेगळ्या क्षेत्रात ह्याचे वेग-वेगळे नावे आहेत.
हा सण आश्विन महिन्यात हस्त नक्षत्र लागल्या पासून सुरू होतो. हा अधिकतर महाराष्ट्रात आणि कोंकणात प्रचलित असलेला सण आहे. या उत्सवात बायका, मुली समुदायाच्या रूपाने खेळ खेळतात. नवरात्राच्या नऊ दिवसात कधी ही आपल्या सोयीनुसार हा खेळ खेळतात. घटस्थापने पासून ते कोजागरी पर्यंत कधीही भोंडला करू शकतो.

हा खेळ मोकळ्या जागीच जसे की अंगणात किंवा गच्चीवर खेळतात. या खेळात एका पाटावर रांगोळीने हत्ती काढून किंवा हत्तीची प्रतिमा ठेवून त्याची पूजा करतात. त्या पाटाच्या भोवती जमलेल्या सगळ्या बायका आणि मुली छोट्या आणि मोठ्या असे मिळून फेर धरतात. आप-आपल्या घरून काही गोड किंवा तिखट खाद्य पदार्थ बनवून आणतात ज्याला खिरापत असे म्हणतात. हा खेळ प्रत्येकीच्या घरी देखील एक-एक दिवस ठरवून करता येतो. या खेळात मधोमध पाटावर हत्ती ठेवून भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरतात.

आता आपल्या मनात असा प्रश्न येणार की हत्तीचं का ठेवतात? तर या मागील कारण असे आहे की हत्तीला समृद्धीचे भरभराटीचे आणि शक्तीचे प्रतीक मानले आहेत. तसेच हा सण म्हणजे आपल्या पृथ्वीच्या सुफलीकरणाचा सण मानला जातो. म्हणून बायकांच्या प्रगतीसाठी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी घाटावर कुमारिका पाटावर धान्याचा हत्ती मांडून त्याची पूजा करतात आणि फेर धरून गाणी म्हणतात. घराच्या भिंतींवर सोंडेत माळ धरलेल्या दोन अमोर-समोर तोंड केलेल्या हत्तीचे चित्र लावतात. त्यांचा वर रंगीत फुलांच्या माळ घालतात आणि फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणतात.

आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृतीची जोपासना करणारा हा आनंददायी सण म्हणजे भोंडला सर्वानीच साजरा केला पाहिजे. आता हा सण घरघुती नसून सामाजिक स्वरूपात साजरा करतात. बऱ्याचशा सामाजिक संस्था देखील महिला मुलींसाठी मोठ्या प्रमाणात भोंडल्याचा आयोजन करतात.आणि आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात. चला तर मग आपण देखील भोंडला करून आपल्या संस्कृतीची जोपासना करावी.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

शाकंभरी नवरात्रौत्सव 2021, नऊ दिवस करा देवीची आराधना

शाकंभरी नवरात्रौत्सव 2021, नऊ दिवस करा देवीची आराधना
दुर्गा देवीच्या विविध रुपांपैकी एक रूप शाकंभरी देवीचं. शाकंभरी देवीचं म्हणजेच देवी ...

कुंभमेळा 12 वर्षांनी का भरतो

कुंभमेळा 12 वर्षांनी का भरतो
देशातील चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन या ...

श्री गुरु गो‍विंद सिंह यांनीच दिले होते पंच ककार धारण ...

श्री गुरु गो‍विंद सिंह यांनीच दिले होते पंच ककार धारण करण्याचे आदेश
शौर्य आणि साहसचे प्रतीक श्री गुरु गोबिंद सिंग यांच्या जन्म बिहारच्या पाटणा शहरात झाला ...

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २०

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २०
श्रीगणेशायनमः ॥ दुर्गेशाकंभरीश्रेष्ठेसहस्त्रनयनोज्वले ॥ ...

Guru Gobind Singh Jayanti गुरु गोविंदसिंग यांच्या 11 सूचना ...

Guru Gobind Singh Jayanti गुरु गोविंदसिंग यांच्या 11 सूचना आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दर्शवतील
1. परदेसी, लोरवान, दु:खी, अपंग, मानुख दि यथाशक्त सेवा करनी : कोणत्याही परदेशी माणूस, ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...